

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील गौणखनिज माफियांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. प्रशासनाने गेल्या सहा महिन्यांत अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकी प्रकरणी ९७ कारवाया केल्या आहेत. या कारवायांमधून दोन कोटींहून अधिकचा दंड वसूल करताना १६ प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच २४ वाहने जप्त केली.
संबधित बातम्या :
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीचे प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे गौणखनिजचा मुद्दा एेरणीवर आला आहे. नाशिक तालुक्यातील सारुळसह ब्रह्मगिरी (ता. त्र्यंबकेश्वर) तसेच अन्य तालुक्यांत माफियांनी उच्छाद घातला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध गाैणखनिजचा मुद्दा थेट मंत्रालयापासून राज्यस्तरावर गाजला होता. या सर्वांमधून धडा घेत जिल्हा प्रशासन व गौणखनिज विभागाने माफियांविरोधात कारवायांचा धडाका लावला आहे.
जिल्हा प्रशासानाने १ एप्रिलपासून ते आजपर्यंत अवैधरीत्या गौणखनिजाचे उत्खनन तसेच वाहतूक विरोधात ९७ कारवाया केल्या आहेत. नाशिक तालुक्यात एप्रिल ते सप्टेंबर या काळात सर्वाधिक २९ प्रकरणांत कारवाई करण्यात आली. त्यानंतर सिन्नरला १५, कळवणमध्ये ११, देवळ्यात ८, दिंडोरीत ६ तसेच निफाड, बागलाण व येवल्यात प्रत्येकी पाच कारवाया झाल्या. याशिवाय मालेगाव आणि नांदगावी प्रत्येकी चार, त्र्यंबकेश्वरला दोन तसेच पेठ, इगतपुरी व चांदवडमध्ये प्रत्येकी एक कारवाई प्रशासनाने केली आहे.
२४ प्रकरणांमधील दंडाची रक्कम थकीत
जिल्हा प्रशासनाने माफियांवर केलेल्या कारवायांमध्ये २ कोटी ३ लाख २१ हजार ३६६ रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी प्रशासनाने संबंधितांकडून एक कोटी तीन लाख ८१ हजार ३४० रुपयांची दंड वसुली पूर्ण केली आहे. तसेच अद्यापही २४ प्रकरणांमधील ९९ लाख ४० हजार २६ रुपये दंडाची रक्कम थकीत आहे.
हेही वाचा :