Nashik : अंबड औद्योगिक वसाहतीत रात्रीतून १३० झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमींचा संताप | पुढारी

Nashik : अंबड औद्योगिक वसाहतीत रात्रीतून १३० झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमींचा संताप

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीत ओ एस – २४ या ग्रीनझोनमध्ये एकाच रात्रीतून तब्बल १३० झाडांची कत्तल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वीही याच भूखंडावरील तब्बल ३०० ते ४०० वृक्षांची कत्तल झाली असतानाही पुन्हा वृक्षांची कत्तल झाल्याने पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदाराला स्थानिक नागरिकांनी विचारले असता वृक्षतोडीची एमआयडीसी महामंडळाने परवानगी दिल्याचे सांगण्यात आले आहे.

संबधित बातम्या :

अंबड औद्योगिक वसाहतीत ३५० हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. या ठिकाणी सुमारे तीन ते ४ लाखांपेक्षा जास्त कामगार काम करतात. या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळावे, यासाठी औद्योगिक वसाहतीत ठीक ठिकाणी ग्रीन झोन तयार करून या ठिकाणी वृक्षांची लागवड केली जाते. या भूखंडावर वड, निलगिरी, पिंपळ, सुबाभूळ यासारख्या विविध प्रजातींचे हजारो वृक्ष लावले होते. भूखंडाचे आरक्षण बदलून गेल्या दोन ते तीन वर्षात या ठिकाणचे ७०० ते ८०० झाडे तोडले. गुरुवारी (दि.२१) मध्यरात्रीही याच ठिकाणी प्लॉट नंबर ७५ मधील १३० वृक्ष मुळासकट तोडून टाकले आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी तसेच ठाकरे शिवसेना गटाचे अंबड शाखा प्रमुख शरद दातीर यांनी वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button