नाशिक : अंबोली शाळेतील ‘त्या’ विद्यार्थीनीच्या मृत्यूचं कारण आलं समोर… | पुढारी

नाशिक : अंबोली शाळेतील 'त्या' विद्यार्थीनीच्या मृत्यूचं कारण आलं समोर...

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील अंबोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पूर्वा विलास गवते या पहिलीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू आतड्याला झालेल्या छिद्रामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक यांनी पेरिनेटीससह आतड्याला छिद्र पडल्याने मृत्यू झाल्याचे आपल्या अहवालात नमूद केले आहे. पूर्वाला अल्सरसदृश आजार होता का? याबाबत पालकांकडे चौकशी करण्यात येत आहे. तसेच पोषण आहारातून बाधा झाली असती, तर शाळेतील अन्य बालकांनाही बाधा झाली असती. त्यामुळे हा अन्नाशी संबंधित मृत्यू नसल्याचा निष्कर्ष अहवालात नमूद करण्यात आला आहे.

संबधित बातम्या :

नेमकं काय घडलं ? 

पूर्वा बुधवारी (दि. 20) दुपारी शाळेत १ च्या सुमारास जेवण करत असताना तिला अचानक उलटयांचा त्रास सुरू झाला. तेथे बाजूलाच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला उपचारासाठी दाखल केले, मात्र तोपर्यंत पूर्वाची तब्येत खालावली होती. तिला तातडीने नाशिकला नेण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला, परंतु रुग्णवाहिकेचा चालक नसल्याने जवळपास अर्धा तास वेळ वाया गेला. तोपर्यंत पूर्वाची शुध्द हरपली होती. तिला खासगी वाहनाने ञ्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दुपारी ४.१५ ला दाखल करण्यात आले. नाशिक जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला तपासले असता तिचे निधन झाल्याचे जाहीर केले.

हेही वाचा :

Back to top button