नाशिकला बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न, परप्रांतीय तरुण ताब्यात | पुढारी

नाशिकला बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न, परप्रांतीय तरुण ताब्यात

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

चॉकलेटचे आमिष दाखवून पाचवर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न करणार्‍या परप्रांतीय तरुणाला नागरिकांच्या सतर्कतेने पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पाचवर्षीय बालिका ही बिटको कॉलेजमागील एका मळ्यात उच्चभ्रू सोसायटीत राहते. या सोसायटीत रात्री 8.30 च्या सुमारास तेथील गणेश मंडपात इतर मुलांबरोबर आरतीसाठी आली होती. आरतीनंतर ही मुलगी घरी जाताना परप्रांतीय संशयित आरोपी महिर मनोज बर्मन (23, रा. ओडीपतोरा, ता. उजिहरा, जि. सतना, मध्य प्रदेश) हा गर्दुल्ला तरुण तेथे आला. त्याने या अल्पवयीन बालिकेला चॉकलेट दाखविले. चॉकलेटच्या आमिषाने ही बालिका त्याच्याजवळ गेली. काही कळण्याच्या आतच तो या बालिकेला कडेवर उचलून घेऊन जाऊ लागला. ही बाब तेथे उपस्थित नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला मोठ्या शिताफीने अडवले व त्याच्या ताब्यातून या मुलीची सुटका केली.

यानंतर ही माहिती उपनगर पोलिस ठाण्यास कळविली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी नागरिकांनी पकडून ठेवलेल्या महिर बर्मनला पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button