अहमदनगर : उपोषणकर्त्यांनी चर्चेची दारे खुली ठेवावीत – गोपीचंद पडळकर | पुढारी

अहमदनगर : उपोषणकर्त्यांनी चर्चेची दारे खुली ठेवावीत - गोपीचंद पडळकर

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षणप्रश्री सरकार सकारात्मक आहे. शेवटी आपला जीव महत्वाचा आहे. त्यामुळे सरकारबरोबर चर्चेची दारे खुली ठेवावीत, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. धनगर आरक्षणप्रश्री चोंडी येथे गेल्या १७ दिवसांपासून चालू असलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आमदार पडळकर यांनी शुक्रवारी रात्री १० वाजता भेट दिली.

यावेळी त्यांनी उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर आणि सूरेश बंडगर यांची चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत माऊली हळणावर, नितीण वाघमोडे ,उध्दव हुलगुंडे उपस्थित होते. यावेळी पडळकर यांनी सरकारबरोबर कालच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असल्याचे सांगताना धनगर समाजाला अनुसुचीत जमातीचे आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठीच आपला प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी पडळकर यांनी दोन्ही उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

हेही वाचलंत का?

Back to top button