नाशिक : आमदार सरोज अहिरेंच्या मतदार संघातील कामांसाठी पुन्हा भरघोस निधी | पुढारी

नाशिक : आमदार सरोज अहिरेंच्या मतदार संघातील कामांसाठी पुन्हा भरघोस निधी

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

देवळाली मतदारसंघात ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद विभागात 10, तर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत 72 अशा 82 विकासकामांसाठी तब्बल दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आ. सरोज आहिरे यांनी दिली. दरम्यान, मंजूर निधीतून मतदारसंघातील तब्बल 71 रस्त्यांची नव्याने कामे व सुधारणा होणार आहे.

संबधित बातम्या :

नाशिक तालुक्यात रखडलेली व नव्याने अपेक्षित विविध विकासकामांसाठी आमदार सरोज आहिरे यांच्याकडे मतदारसंघातून झालेल्या मागणीनुसार आ. आहिरे यांनी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत 10 कामांसाठी 1 कोटी 80 लाख रुपये, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 72 कामांसाठी 8 कोटी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ही कामे मंजुरी व निधी उपलब्धतेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आ. आहिरे यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामे

शिंदे, गोवर्धन, गंगावाडी, पिंपळद, लहवित, गिरणारे, विंचूर गवळी, गणेशगाव नाशिक, दुगाव-मुंगसरे रस्ता, मातोरी, कोटमगाव, माडसांगवी, दोनवाडे, वाडगाव, बाभळेश्वर, गिरणारे, संसरी, शेवगेदारणा, पळसे, ओढा, साडगाव, मुंगसरे, जाखोरी, चांदगिरी, लाखलगाव, विल्होळी, गौळाणे, महादेवपूर, माडसांगवी या गावांत रस्ते सुधारणा व नवीन रस्ते कामांसाठी 7.50 कोटी, तर गोवर्धन येथील दशक्रिया विधी घाट विकसित करण्यासाठी 50 लाख रुपये असा तब्बल 8 कोटी 20 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पावसात खराब झालेल्या रस्त्यापैकी अनेक रस्त्यांना पुन्हा एकदा चकाकी मिळणार आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर कामे

सय्यद पिंप्री जनार्दनस्वामी कुटीया येथे डोम बांधणे (30 लाख), धोंडेगाव-सभामंडप (30 लाख), जातेगाव-सभामंडप (25 लाख), महिरावणी-स्मशानभूमी (20 लाख), हिंगणवेढे-सभागृह (15 लाख), राजूरबहुला-दशक्रिया विधी शेड (15 लाख), साडगाव-सभागृह (15 लाख), महादेवपूर-डंबाळे वस्ती सभामंडप (10 लाख), सय्यदपिंपरी – स्वामी समर्थ केंद्र (10 लाख), जलालपूर मारुती मंदिर सभामंडप नूतनीकरण (10 लाख), ओढा कैवल्य आश्रम दत्तमंदिरास सभामंडप (10 लाख), दहेगाव येथे सभामंडप (10 लाख) अशी कामे प्रस्तावित आहेत.

हेही वाचा :

Back to top button