परभणी : एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने लंपास | पुढारी

परभणी : एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने लंपास

चारठाणा पुढारी प्रतिनिधी : एस टी महामंडळाच्या जालना ते जिंतूर कडे जाणाऱ्या शिवशाही बस मधून प्रवासी महिलेचे सात तोळे सोन्याची दागिने अज्ञात चोरट्याकडून  लंपास. किमान तीन लाख 37 हजार रुपये किमतीचे दागिने असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.१९) रोजी घडली. सदर महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात तोळ्यांचे दागिने लंपास

माहितीनुसार,  विजू  भुवा या पती रघु भुवा भुवा (लिबडी,जि. सुरेंद्रनगर, गुजरात) यांच्यासह मागील वीस वर्षांपासून पाथरी येथील देवनांद्रा साखर कारखाना परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या दूध व्यवसायाच्या धंदा आहे. दरम्यान मागील आठ दिवसापूर्वी रघु पत्नी विजू व मुलगी काजल यांच्यासह नातेवाईकांना भेटण्यासाठी सुरत गुजरात येथे गेले होते.  सोमवारी (दि.१८) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गुजरात येथून खाजगी खाजगी ट्रॅव्हल्सने मंगळवारी (दि.१९) जालना येथे उतरले.  त्यानंतर जालना ते जिंतूरकडे जाणाऱ्या शिवशाही बसने प्रवास करीत देवगाव फाटा येथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उतरले. देवगाव फाटा येथील एका हॉटेलवर चहापाणी घेतल्यानंतर पत्नी विजू यांच्या जवळील बॅग उघडल्यानंतर दागिने चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

बॅगमध्ये तीन तोळे सोन्याचा नेकलेस, चार तोळे वजनाचे पाटी पारा नावाच्या गल्सर असे एकूण सात तोळे वजनाचे सोन्या चें दागिने एकूण  लंपास झाल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकार घडल्यानंतर पत्नीची प्रकृती बिघडल्याने तिला पाथरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडले. त्यानंतर सेलू येथील मित्र प्रकाश सिंह उदयसिंह राजपूत यांना सोबत घेऊन बुधवारी (दि.२०)  चारठाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील वासलवार करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button