नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव बंद | पुढारी

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आजपासून कांदा लिलाव बंद

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने आपल्या विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्री आणि पणनमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करूनही मागण्या मान्य न झाल्याने आज (दि. २०) पासून बाजार समित्या बेमुदत बंद करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत १९ सप्टेंबरपर्यंत कुठलाही तोडगा न निघाल्याने बाजार समित्या आजपासून बेमुदत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबधित बातम्या :

संबंधित बातम्या

शनिवारी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या मागण्यांवर तोडगा निघाला नव्हता. लासलगावसह जिल्ह्यातील १७ बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असल्याने एका दिवसात साधारणतः ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे.

मागील महिन्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्यानंतर जिल्ह्यातील सर्व कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवत या निर्णयाचा विरोध केलेला होता. गेल्या 20 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील व्यापारीवर्गाने शेतकरी हितासाठी कांदा लिलाव बंद ठेवल्याचे सांगितले होते. मात्र, आता तब्बल एक महिन्यानंतर पुन्हा कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर आणि दुष्काळाचे सावट असताना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असल्याने कांद्यासह इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button