दोन मराठी अधिकारी केंद्रात अतिरिक्त सचिव | पुढारी

दोन मराठी अधिकारी केंद्रात अतिरिक्त सचिव

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मूळचे सांगलीकर सनदी अधिकारी सध्या तामिळनाडूच्या राज्यपालांचे प्रधान सचिव असलेले आनंद पाटील तसेच मूळचे पुणेकर आणि केंद्रशासित प्रदेश केडरचे सनदी अधिकारी संतोष वैद्य या दोन मराठी अधिकार्‍यांना केंद्रात अतिरिक्त सचिवपदी बढती मिळाली आहे.

आनंद पाटील यांना केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागात अतिरिक्त सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे; तर संतोष वैद्य हे केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये वित्त विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी हाताळत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने कालच (16 सप्टेंबर) 16 अधिकार्‍यांच्या अतिरिक्त सचिवपदी पदोन्नतीचा आदेश जारी केला. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील 1998 बॅचचे तामिळनाडू केडरचे अधिकारी आनंद पाटील, त्याचप्रमाणे केंद्रशासीत प्रदेश केडरचे सनदी अधिकारी संतोष दत्तात्रेय वैद्य तसेच महाराष्ट्र केडरचे राजीवकुमार मित्तल आणि सौरभ विजय या अधिकार्‍यांचाही समावेश आहे.

Back to top button