

नाशिक : धारदार शस्त्र बागळणाऱ्या संशयिताला उपनगर पोलिसांनी पकडले. दीपक आर. पगार (४०, रा. देवळाली गाव) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला विहितगाव परिसरातून शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी शस्त्रासह पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
द्वारका भागात तडीपार जेरबंद
नाशिक : शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही शहरात विनापरवानगी फिरणाऱ्याला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरबाज मोईन बागवान (२३, रा. भारतनगर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. अरबाजला तडीपार केलेले असूनही तो शुक्रवारी (दि. १५) रात्री 8 ला द्वारका सर्कल परिसरात आढळला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :