Jalgaon : एरंडोल जवळ खासगी ट्रॅव्हल्सला अपघात; दोन ठार, १२ प्रवासी जखमी | पुढारी

Jalgaon : एरंडोल जवळ खासगी ट्रॅव्हल्सला अपघात; दोन ठार, १२ प्रवासी जखमी

जळगाव : एरंडोल तालुक्यात पिंपळ कोठा गावाजवळ मोठा अपघात झाला आहे. एक भरधाव खासगी ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळून पलटी झाल्याने १२ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे कळते. ही घटना शनिवारी सकाळी ८:३० वाजता पिंपळकोठा ता. एरंडोलनजीक घडली.

संबधित बातम्या :

खासगी ट्रॅव्हल्स दुभाजकावर आदळून पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी तीन जणांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही लक्झरी बस राजस्थानकडून जळगावमार्गे औरंगाबादकडे जात होती. पिंपळकोठानजीक एका छोट्या पुलाच्या कठड्यावर बस धडकली आणि खाली कोसळली. यात चालकासह एक जण ठार झाला असून १०- १२ प्रवासी जखमी झाले. यातील मृत चालकाचे नाव कळू शकले नाही.

संततधार पावसाने चालकाला वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती.

हेही वाचा :

Back to top button