Nashik Crime : बेपत्ता झालेल्या ‘त्या’ युवकाचा खून, पाच संशयितांना घेतलं ताब्यात | पुढारी

Nashik Crime : बेपत्ता झालेल्या 'त्या' युवकाचा खून, पाच संशयितांना घेतलं ताब्यात

नाशिक : जेलरोड पंचक येथील आठ दिवसापूर्वी बेपत्ता असलेल्या युवकाचा पंचक येथील गोदावरी नदी किनारी मनपा मलनिसारण केंद्राजवळील निर्जनस्थळी मृतदेह आढळून आला. युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (30, रा. पंचक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तो भांडी विक्रीचा व्यवसाय करत होता. गेल्या रविवारी 3 सप्टेंबर रोजी दुपारी ज्ञानेश्वर हा घरून जेवण बनवून तो दुचाकीवर गेला होता. मात्र तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. त्याची पत्नी साधना ज्ञानेश्वर गायकवाड हिने नाशिकरोड पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद केली होती.

दरम्यान सोमवार 11 सप्टेंबर रोजी दुपारी पंचक गावातील सोमनाथ बोराडे याना ज्ञानेश्वरचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्यांनी या घटनेची माहिती तत्काळ पंचक ग्रामस्थांसह नाशिकरोड पोलिसांना दिली‌. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांनी पोलीस कर्मचाऱ्यांणी घटनास्थळी धाव घेतली. तेथे पालापाचोळ्याखाली झाकलेला, कुजलेला मृतदेह मिळून आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button