Nashik Crime : काकाचा खून करणाऱ्या पुतण्याला जन्मठेप

Nashik Crime : काकाचा खून करणाऱ्या पुतण्याला जन्मठेप

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शेतातील सामाईक विहिरीतून पाणी भरण्याच्या वादातून चुलत काकाचा खून करणाऱ्या पुतण्याला मालेगाव न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. नांदगाव तालुक्यातील मांडवळ गावात दि. २ सप्टेंबर २०१६ रोजी ही घटना घडली होती. आशाबाई मधुकर गडाख यांनी नांदगाव पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. Nashik Crime

त्या दिवशी सकाळी ७.१५ वाजता त्यांच्या सामाईक विहिरीवर चुलतपुतण्या राहुल दिलीप गडाख (२४) याचे काका मधुकर शिवराम गडाख (४५) यांच्याशी विहिरीतील पाणी भरण्यावरून वाद झाला होता. Nashik Crime

भांडण विकोपाला जाऊन राहुलने लाकडी दांडक्याने मधुकर यांना केलेल्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. सहायक पोलिस निरीक्षक एस. जे. महाले यांनी घटनेचा तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. हा खटला जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे अशोक पगारे यांनी एकूण १० साक्षीदार तपासले. त्यांच्या युक्तिवादाने गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला राहुलला जन्मठेप आणि १० हजारांचा दंड झाला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news