नाशिक : उकळते पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू | पुढारी

नाशिक : उकळते पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

घरात खेळत असताना अंगावर उकळते पाणी पडल्याने गंभीर भाजलेल्या दाेनवर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयश्री तुकाराम सिद (२, रा. कुशेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक) असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. याबाबत वाडीवऱ्हे पाेलिसांत आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

जयश्री ही दि. ३० ऑगस्ट राेजी रात्री 8 वाजता खेळत हाेती. त्यावेळी घरातील उकळते पाणी तिच्या अंगावर पडले होते. यात ती गंभीर भाजल्याने वाडीवऱ्हे रुग्णालयात दाखल केले होते. तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान मंगळवारी (दि. ५) दुपारी तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

Back to top button