साक्री तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती

साक्री तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती

पिंपळनेर, ता. साक्री पुढारी वृत्तसेवा :  साक्री तालुक्यातील मालपूर व खुडाणे (निजामपूर) येथील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मालपूर गावचे विश्वेश्वर दौलत पाटील हे ठाणे जिल्हा रुग्णालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी पदी झाली आहे. ते लवकरच येथील पदभार स्वीकारतील.

खुडाणे (निजामपूर) गावचे प्रशांत पाटील हे पुणे येथे आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) कार्यालयात सह संचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती आरोग्य सेवा विभाग उपसंचालक नाशिक मंडळ नाशिक येथे मुख्य प्रशासकीय अधिकारी पदी झाली आहे. ते देखील लवकरच येथील पदभार स्वीकारणार आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news