नाशिक : लाचखोर लेखाधिकाऱ्याला १० हजारांची लाच स्वीकारताना अटक | पुढारी

नाशिक : लाचखोर लेखाधिकाऱ्याला १० हजारांची लाच स्वीकारताना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी विकास विभागाच्या नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात लाचखोर लेखाधिकाऱ्याला १० हजारांची लाच स्वीकारताना शुक्रवारी (दि.१८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. भास्कर जेजुरकर असे लाचखोर लेखाधिकाऱ्याचे नाव असून, आदिवासी आयुक्तालयाच्या आवारात जेजुरकर हे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले.

आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांना निवासासाठी भाडेतत्त्वावर इमारती घेतल्या जातात. इमारत भाडे देयके मंजूर करण्याच्या मोबदल्यात लेखाधिकारी जेजुरकर यांनी तक्रारदाराकडे १० हजारांची मागणी केली होती. तक्रारदारांच्या तक्रारीची शहानिशा करून एसीबीच्या पथकाने आदिवासी आयुक्तालय आवारात सापळा रचला. बागूल हे लाच स्वीकारत असतानाच एसीबीने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या प्रकरणी शुक्रवारी (दि.१८) रात्री उशिरापर्यंत मुंबईनाका पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. लाचखोर जेजुरकर यांना शनिवारी (दि.१९) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हेही वाचा :

Back to top button