नंदुरबार : नवापाडा गावात 10 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त | पुढारी

नंदुरबार : नवापाडा गावात 10 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा गावात छापा टाकला. निरीक्षक डी.एम.चकोर यांच्या नेतृत्वात  टाकलेल्या या छाप्यात परराज्यातील मद्यसाठ्यासह एकुण 9 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

काल (दि. 30) राज्य उत्पादन शुल्क आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी, विभागीय उपायुक्त डॉ.बी.एच.तडवी, अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गुप्त बातमीनुसार कुडाची झोपडीत नवापाडा शिवार ता.अ.कुवा जि.नंदुरबार याठिकाणी छापा टाकला असता तेथे तेथून 9 लाख 72 हजारांचा माल मिळून आला.

डी एम चकोर निरीक्षक रा.उ.शु. भरारी पथक नंदुरबार, बी.एस. महाडीक निरीक्षक रा.उ.शु.नंदुरबार, एस.आर.नजन दुय्यम निरीक्षक, सागर इंगळे दुय्यम निरीक्षक, प्रशांत एस.पाटील दुय्यम निरीक्षक रा.उ.शु., जवान सर्वश्री, हितेश जेठे, संदिप वाघ,  एम. के. पवार सहा. दु. निरीक्षक, रामसिंग राजपुत सहा.दु.निरीक्षक, मानसिंग पाडवी, धनराज पाटील, हेमंत पाटील, संजय बैसाणे,  राहुल साळवे यांनी केली. गुन्हयाचा तपास डी.एम. चकोर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार हे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button