Kiran Kurma : गडचिरोलीची लेडी टॅक्सी ड्रायव्हर किरणला मुख्यमंत्र्याकडून ४० लाखांची शिष्यवृत्ती; लवकरच जाणार युकेला | पुढारी

Kiran Kurma : गडचिरोलीची लेडी टॅक्सी ड्रायव्हर किरणला मुख्यमंत्र्याकडून ४० लाखांची शिष्यवृत्ती; लवकरच जाणार युकेला

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा नक्षग्रस्त म्हणून ओळखला जातो. पण टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या इथल्या एका मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधून घेतले आहे. किरण कुर्मा असे तिचे नाव आहे. तिला लंडनला जाऊन आपले इच्छेनुसार शिक्षण घेता यावे यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी चाळीस लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याचे किरणचे स्वप्न पूर्ण होणार आहे. जाणून घ्या किरणची गोष्ट. (Kiran Kurma)

Kiran Kurma : नोकरीसाठी टॅक्सी चालवायला सुरुवात केली

किरण कुर्मा गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील रेगुंथा गावची रहिवासी आहे. तिने तेलंगणा राज्यातील हैदराबाद उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने रोजगारासाठी आपल गाव रेगुंठा ते सिरोंचा येथे टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली.

४० लाखांची शिष्यवृत्ती

माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील किरण कुर्मा ही मुलगी सध्या चर्चेत आहे. किरण रेगुंठा या गावची रहिवासी आहे. तिला नुकतीच ४० लाखांची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. या शिष्यवृत्तीचा वापर करुन तिने युकेला  लीड्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय मार्केटिंग मॅनेजमेंटचा एक वर्षाचा अभ्यासक्रम करण्यासाठी करण्याची योजना आखली आहे.  तेथील एका कंपनीत 2 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी घरी परतण्याचा प्लॅन केला आहे.

हेही वाचा

Back to top button