नाशिक : समुपदेशनानंतर मामाचा जावयावर चाकू हल्ला | पुढारी

नाशिक : समुपदेशनानंतर मामाचा जावयावर चाकू हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

समुपदेशन सुरू असताना मुलीच्या मामाने भाचेजावयावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी घडली. शरणपूर रोडवरील महिला सुरक्षा विभाग अर्थात ‘भराेसा सेल’ परिसरात हल्ल्याचा थरार रंगल्याचे खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर सर्वत्र रक्ताचा सडा पसरला होता.

मागील काही दिवसांपासून संतोष पंडित अहिरे आणि पौर्णिमा अहिरे या दाम्पत्यांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होते. दोघांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी त्यांना भराेसा कक्षात समुपदेशनासाठी बोलविण्यात आले होते. पौर्णिमा यांच्यासोबत मामा नानासाहेब नारायण ठाकरे व इतर नातेवाईक उपस्थित होते. समुपदेशनानंतर ते सर्व जण कक्षाबाहेरील परिसरात चर्चा करत होते. त्यांच्यात आपसात वाद झाल्याने मुलीच्या मामाने खिशातील चाकू काढून संतोष अहिरे यांच्या पोटावर वार केले.

प्राणघातक हल्ल्यानंतर पळण्याच्या तयारी असलेल्या हल्लेखोर मामाच्या कक्षातील महिला पोलिस व इतर अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळल्या. तसेच गंभीर जखमी झालेल्या संतोष अहिरेला तत्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. संतोषच्या पोटावर खोलवर चाकूचा घाव बसला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी मुलीचा मामा नानासाहेब ठाकरे यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button