नाशिक : समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाका मनसे पदाधिकाऱ्यांनी फोडला | पुढारी

नाशिक : समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाका मनसे पदाधिकाऱ्यांनी फोडला

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाका (ता. सिन्नर) आज (रविवार) पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास मनसैनिकांनी फोडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे वाहन अडवून त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी टोल नाका फोडल्याचे सांगितले जात आहे.

अमित ठाकरे यांचे वाहन अडविल्यानंतर सिन्नर तालुका पदाधिकाऱ्यांनी या टोल नाक्यावर धाव घेऊन रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास टोल नाका व्यवस्थापनाला इशारा दिला होता.

वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मध्यस्थीने वादावर पडदाही पडला होता. मात्र रविवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांनी गोंदे टोलनाक्यावर हल्ला चढवला. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह सुमारे 20 ते 25 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा गोंदे टोलनाका येथे दाखल झाला आहे.

हेही वाचा :  

Back to top button