नाशिक : ज्वेलर्समध्ये सेल्सवुमनकडूनच १२ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला | पुढारी

नाशिक : ज्वेलर्समध्ये सेल्सवुमनकडूनच १२ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सेल्सवुमनने १२ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार कॉलेज रोड परिसरात उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालक जिनेंद्र अजित शहा (४०, रा. कॉलेजरोड) यांच्या तेजस्वी ज्वेलर्समध्ये दि. ६ मे ते १७ जून या कालावधीत सातत्याने काही दिवसांच्या अंतरांनी सोन्याचे ब्रेसलेट व हिऱ्यांच्या अंगठ्यांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

संशयित सेल्सवुमन काजल अविनाश अहिरे (२३, रा. शिंगाडा तलाव) कडे चोरीसंदर्भात विचारणा केल्यावर त्यांना अचानक भोवळ आली. त्यानंतर पतीसमवेत निघून गेलेली काजल पुन्हा कामावर परतलीच नाही. वेळोवेळी संपर्क साधूनही तिने कोणतेही प्रत्युत्तर न दिल्याने तिच्याबाबत संशय निर्माण झाला. अखेर मालक शहा यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button