Rohit Sharma Record : रोहित ठरला भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू; धोनीला टाकले मागे | पुढारी

Rohit Sharma Record : रोहित ठरला भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू; धोनीला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतकी (८०) खेळी केली. या सामन्यात रोहितला शतक झळकावता आले नाही. पण त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. (Rohit Sharma Record)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २००० धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला. रोहितची कसोटी क्रिकेटमधील ही सलग २९वी खेळी होती. ज्यात त्याने धावांचा दुहेरी आकडा पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितपूर्वी श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने सलग २९ डावांत दुहेरी आकडा पार केला होता. रोहितने पुढच्या डावातही १० धावा केल्या तर सलग ३० डावात दुहेरी धावा करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरेल. (Rohit Sharma Record)

विशेष बाब म्हणजे डावाची सुरुवात करताना रोहितने सलग २९ डावात दहा धावांचा आकडा गाठला आहे. यासह रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा भारतीय फलंदाज बनला आहे. यामध्ये त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे.

धोनीने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७२६६ धावा केल्या आहेत, तर रोहितने भारतासाठी १७२८१ धावा केल्या आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आहे. सचिनने ६६४ सामन्यांमध्ये ३४३५७ धावा केल्या आहेत. तर, विराट कोहलीने २५४६१ धावा केल्या आहेत. तेंडुलकरने भारताव्यतिरिक्त कोणत्याही संघाकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.

राहुल द्रविड २४२०८ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा माजी कर्णधार आयसीसी वर्ल्ड इलेव्हन आणि आशिया इलेव्हनसाठी काही सामने खेळला आहे. सौरव गांगुली १८५७५ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. तर धोनीला मागे टाकत रोहितने यादीमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.

हेही वाचा;

Back to top button