अजित पवारांसोबत जाणे ठरले फलदायी, देवळाली मतदारसंघातील विकासकामांठी ४० कोटी

अजित पवारांसोबत जाणे ठरले फलदायी, देवळाली मतदारसंघातील विकासकामांठी ४० कोटी

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

देवळाली मतदारसंघाच्या विकासासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार सरोज अहिरे यांनी 40 कोटींची विकासकामे मंजूर करून घेतली. तीनच दिवसांपूर्वी त्यांनी मतदारसंघातील विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णय हा सार्थ ठरला असून, मतदारसंघाचा खुंटलेला विकास निधीच्या माध्यमातून पुन्हा सुरू होत आहे.

पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या अंतर्गत देवळाली मतदारसंघासाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या तिन्ही अधिवेशनांत आ. अहिरे यांना अवघा 10 कोटींचाच विकास निधी मिळाला होता. मात्र यंदा अधिवेशानाच्या पहिल्याच दिवशी चांगला निधी मिळाला आहे.

मंजूर केलेल्या निधीत 10 कोटी आदिवासी भागातील विकासकामांसाठी खर्च केला जाणार आहे, तर 25 कोटी रुपये रस्ते, पूल, संरक्षक भिंत बांधणेक, तर उर्वरित पाच कोटी गिरणारे ग्रामीण रुग्णालयाकरिता खर्च करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अज़ित पवार यांच्याकडे अर्थ खाते असल्याने देवळाली मतदारसंघात पुढच्या काही दिवसांमध्ये भरघोस निधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news