धुळे : मानवी जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण : स्वामी शिवानंद दादा | पुढारी

धुळे : मानवी जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण : स्वामी शिवानंद दादा

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

संत हे समाज जीवनाचे खरे मार्गदर्शक असून, संतांच्या गुरु वचनाप्रमाणे मानवाने त्यांच्या तत्त्वांचा अवलंब केल्यास आत्मसाक्षात्कार व आत्मन्नौती होते. जीवनाचे कल्याण होते. यासाठी मानवाने आसक्ती, विषय व अवगुणांचा त्याग केला पाहिजे. जीवन कृतार्थ बनवायचे असेल तर जीवनात गुरु आवश्यक आहे, असे प्रतिपादन  स्वामी शिवानंद दादाजी महाराज यांनी केले.

येथील ओम स्वामी शिवानंद दादाजी प्रतिष्ठान तर्फे गुरू पौर्णिमा निमित्ताने दोन दिवस आद्य स्वामी शिवानंद दादाजी महाराज यांचे प्रवचन झाले. ओम दादाजी दरबारात महाआरती करण्यात आली. द्वारका मैया यांच्या हस्ते मुख्य निशाणाचे पूजन करण्यात आले. यानंतर भजन संगीताचा कार्यक्रम पार पडला. स्वामी शिवानंद दादाजी यांनी गुरुचे नवी जीवन या विषयावर मार्गदर्शन केले. मानवी जीवनात भक्तीचे मूल्य पटवून दिले. ओम दादाजी दरबारापासून शोभायात्रा काढण्यात आली. गावातील अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमास ज्ञानेश्वर एखंडे, धनराज जैन, पांडुरंग सूर्यवंशी, तानाजी खोडे, भालचंद्र दुसाणे, रामायणाचार्य राजू महाराज राठोड, विदर्भाचे भागवताचार्य मुख्यनकर महाराज, सुभाष जैन, ओम दादाजी प्रतिष्ठानचे शिवाजीराव भोर, साहेबराव नंदन, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी खेडकर, ललित साळवे, उद्योजक वसंतराव जरे, आरटीओ नंदकुमार उबाळे, किरण पांडुरंग, जी.पी.तांबे, कृष्णांक शिंदे, जि.प. सदस्य संदेश कार्ले, पी.डी.चव्हाण, कुमार शितोळे, नगरसेवक शिवाजी लोंढे, प्रवीण गांगुर्डे, सचिन माने, उमेश चोरडिया, गणेश पाटील, जाचक महाराज, डॉ. राजेंद्र पगारे, चेतन पगारे, ओमप्रकाश तीरोले, भटू सोनवणे,अशोक कोठावदे उपस्थित होते.

यावेळी प.पू शिवानंद दादाजी महाराज यांना चांदीचा टोप भक्तांनी प्रदान केला. नाशिकच्या ज्ञानसिंधू प्रकाशनतर्फे महाराजांचा राज्यस्तरीय ज्ञानसिंधू अध्यात्म भूषण पुरस्कार देऊन तानाजी खोडे व त्यांच्या टीमने सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. दोन दिवसीय कार्यक्रमात महाआरती, प्रवचन, भजन गायन, दिंडी स्वागत, अनुग्रह, महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले. यावेळी तानाजी खोडे, सुभाष जगताप, साहेबराव नंदन, ललित साळवे, डी.टी. पाटील, भालचंद्र दुसाने यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलान प्रमोद शिंदे यांनी केले.

हेही वाचा : 

Back to top button