जळगावात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा अजब राजीनामा, पक्ष कार्यालयासमोर झळकले भलेमोठे बँनर | पुढारी

जळगावात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा अजब राजीनामा, पक्ष कार्यालयासमोर झळकले भलेमोठे बँनर

जळगा‍‍‍व : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करुन शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील आमदार अनिल पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता पक्षाचे तरुण फळीतील पदाधिकारी आता पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे. तशाच पध्दतीने राष्ट्रवादीच्या अर्बन सेलचे माजी प्रदेश चिटणीस, अर्बन सेल समन्वयक मूवीकोराज कोल्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा अनोख्या पध्दतीने दिला आहे. त्यामुळे हा शहरात हा चर्चेचा विषय ठरत आहे.

मूविकोराज कोल्हे यांनी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर राजीनाम्याचे भव्य बँनर झळकविले आहे. त्यांनी हा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविला आहे. या बँनरवर त्यांनी जाहिररित्या पक्षाविरोधात भूमिका मांडली आहे. यात म्हटले की, “अजित पवार यांनी राज्य सरकारमध्ये सामील होण्याचा घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारा आहे. ज्या तळमळीने दादांनी पक्ष वाढीसाठी आग्रही भूमिका घेतली. मात्र, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना एकाकी टाकण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात राष्ट्रवादी विद्यार्थी व युवक काँग्रेसचे संघटन बांधणीसाठी आम्ही अनेक कार्यक्रम घेतले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव असे नामकरण करण्यासाठी उभारलेला लढा तुम्ही पाठबळ दिल्यानेच यशस्वी झाला. पण, निव्वळ अजितदादांचा समर्थक म्हणून मला पक्षसंघटना बांधणी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला अखेर पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button