पुढारी ऑनलाईन : शरद पवार यांनी तुम्हाला स्वत:च्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुम्हीच होता, ज्यांचावर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. मग तुम्हाला साहेबांनी अजून काय कमी केलं होतं, जेणेकरून तुम्हाला अशी गुलामी पत्करावी लागली? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दिलीप वळसे-पाटील यांना ट्विटरवरून केला आहे. तसेच रोहित यांनी ट्विटसोबत दिलीप वळसे-पाटील यांच्यावर शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून असणारा जबाबदारीचा (Maharashtra Politics News) बायोडेटा देखील शेअर केला आहे.
रोहित पवार यांनी ट्विमध्ये म्हटले आहे की, असे काय घडले की, तुम्हाला आपल्या विचारधारेला मुठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचे आहे. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अपेक्षित न्हवती. पण असो… प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद सह्याद्रीत (शरद पवार) (Maharashtra Politics News) आहे.
सह्याद्री म्हणजेच शरद पवार यांच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे. नव्या जोमाने आणि ताकदीने सह्याद्री पुन्हा उभा राहीलच, पण तुम्ही, तुमच्या कृतीबद्दल स्वत:ला कधी माफ करू शकाल का? असा सवाल देखील दिलीप वळसे-पाटील (Maharashtra Politics News) यांना रोहित पवार यांनी केला आहे.