नाशिक : औद्योगिक बंद बाबत पुनर्विचार करावा; सिटूचे निमाला निवेदन | पुढारी

नाशिक : औद्योगिक बंद बाबत पुनर्विचार करावा; सिटूचे निमाला निवेदन

नाशिक  (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी तक्रार नोंदवूनही अद्याप पर्यंत कारवाई झाली नाही.  या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी व गुन्हेगारांना अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसासाठी उद्या (दि. 2) रोजी औद्योगिक बंद चे आवाहन केले आहे. यासंदर्भात आपण घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे परंतु औद्योगिक बंद करण्याबाबत आपण पुनर्विचार करावा अशा मागणीचे निवेदन सिटूच्या वतीने निमा संघटनेचे सेक्रेटरी राजेंद्र अहिरे व एक्झिक्यूटिव्ह कमिटी मेंबर हेमंत खोंड यांना देण्यात आले.

औद्योगिक बंद केल्यास उत्पादनातही खंड पडेल व कामगारांच्या वेतनाचा ही प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात औद्योगिक बंद न करता सर्व औद्योगिक संघटना व कामगार संघटनांनी 3 जून रोजी शनिवारी कायदेशीर मार्गाने मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध करावा व मागण्या सादर कराव्यात आणि त्यानंतरही प्रशासनाने कारवाई न केल्यास आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यामध्ये बंदचे आवाहन करावे अशी आमची सूचना असल्याचे सिटू च्या वतीने निमाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर काही अनिष्ट प्रवृत्तींनी हल्ला करून तोडफोड केली यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडे तक्रार नोंदवूनही अद्याप पर्यंत कारवाई झाली नाही. या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी व गुन्हेगारांना अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी निमासह विविध संघटनांनी दोन जून रोजी औद्योगिक बंद करण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. संदर्भात आपण घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे परंतु औद्योगिक बंद करण्याबाबत आपण पुनर्विचार करावा असे आवाहन निवेदनात केले आहे.

या संदर्भात आपण घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे परंतु औद्योगिक बंद करण्याबाबत आपण पुनर्विचार करावा असै आपणास आवाहन आहे.

निवेदन देताना सिटूच्या वतीने सीटू चे उपाध्यक्ष भिवाजी भावले, अरविंद शहापुरे, सेक्रेटरी संतोष काकडे, तुकाराम सोनजे, संतोष कुलकर्णी व खजिनदार मोहन जाधव त्याचबरोबर टिडीके कंपनीचे कमिटी सदस्य संदीप दाभाडे, अमर शेवकर, चंद्रकांत पाटील, संदीप बोरसे, सचिन गटकळ, रिलायबल कंपनीचे कमिटी सदस्य नवनाथ शेळके व संतोष केदारे, नोवतीयार इलेक्ट्रिकल कंपनीचे कमिटी सदस्य आर डी पवार व आर बी पाटील उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button