नाशिक : बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यांवर डल्ला, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरातील लाखाेंचा ऐवज लंपास | पुढारी

नाशिक : बंद घराचे कुलूप तोडून दागिन्यांवर डल्ला, सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरातील लाखाेंचा ऐवज लंपास

चांदवड (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा

दुपारच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी कोणी नसल्याचा फायदा घेत बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील कपाट तोडून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दुचाकीवर पळ काढला. ही घटना तालुक्यातील डोणगाव (ता.चांदवड) येथे दिवसाढवळ्या घडल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. या घटनेबाबत हरिभाऊ शेळके यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दिल्याने अज्ञात दोघा भामट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

डोणगाव येथील सेवानिवृत्त हरिभाऊ पांडुरंग शेळके (६३) हे कुटुंबीयासमवेत राहतात. मंगळवार (दि.२३) हरिभाऊ व पत्नी मीराबाई हे वराडी येथील बहिणीकडे कार्यक्रमासाठी गेले होते. घराला कुलूप असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोघा भामट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाट तोडून कपाटातील ६० हजार रुपये किंमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन व ओम पान; ४५ हजार रुपये किंमतीचा १५ ग्रॅम वजनाचा राणी हार; १ लाख ८ हजार रुपये किंमतीचा ३६ ग्रॅम वजनाची पट्टी पोत; ५४ हजार रुपये किंमतीची १८ ग्रॅम वजनाची शॉर्ट पोत असा एकूण २ लाख ६७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व ४ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दुचाकीवरून पोबारा केला. या घटनेबाबत हरिभाऊ शेळके यांनी चांदवड पोलिसात चोरीची फिर्याद दिल्याने अज्ञात दोघा भामट्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button