बारावीच्या परीक्षेचा निकाल आज | पुढारी

बारावीच्या परीक्षेचा निकाल आज

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 25) दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

पुणे, कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी –  मार्च 2023 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. कोल्हापूर विभागातून 1 लाख 20 हजार 790 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. कोल्हापूरमधून जिल्हा 50 हजार 646, सातारामधून 36 हजार 87, सांगलीमधून 34 हजार 57 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. एकूण 170 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडल्या.

निकालासाठी संकेतस्थळ

विद्यार्थ्यांना   mahresult.nic.in, https:///hsc.maharesults.org. in, http:///hscresult.mkcl.org   या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

Back to top button