जळगाव : नाचता-नाचता चक्कर येऊन खाली कोसळताच तरुणाचा मृत्यू

जळगाव : नातेवाईकांकडे असलेल्या धार्मिक कार्यक्रमात नाचताना चक्कर येऊन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना चोपडा शहरात घडली असून, संदीप नीळकंठ चव्हाण (वय २४, रामपूरा, पारधीवाडा) असे मयताचे नाव आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चोपडा शहरातील रहिवासी संदीप चव्हाण याच्या काकांकडे कुलदैवताचा नवसाचा धार्मिक कार्यक्रम होता. यानिमित्त रात्रभर कार्यक्रम सुरु होता. याच कार्यक्रमात धार्मिक गाण्यांवर संदीप नाचत होता. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास नाचता नाचता संदीपला अचानक चक्कर आले आणि तो जमिनीवर पडला. त्याला तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉ. प्रसाद पाटील यांनी संदीप यास मृत घोषित केले. मृत्यूच्या काही तासांपूर्वी संदीपने चुलत भावाच्या लग्नाच्या वाढदिवस साजरा केला होता. त्यामुळे ज्या घरात धार्मिक कार्यक्रमानिमित्त आनंदाचे वातावरण होते, त्याठिकाणी अवघ्या क्षणात शोककळा पसरली. संदीप याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
हेही वाचा :