राहुरी : चॉपरने अंगावर वार करत खुनाचा प्रयत्न

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : ‘आमच्या मुलीला त्रास का देता,’ अशी विचारणा करीत जबरदस्तीने घरात घुसून पतीसह पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. फिर्यादी महिलेचा ब्लाऊज फाडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे घडली. दि. 14 मे रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान 40 वर्षीय महिला व घरातील इतर लोक घरात असताना आरोपींनी जबरदस्तीने तिच्या घरात घुसून, ‘तुम्ही आमच्या मुलीला त्रास का देता,’ असे म्हणत महिलेसह पतीला शिवीगाळ करून दांड्यासह लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत महिलेचा ब्लाऊज फाडून तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.
‘तुम्ही या गावामध्ये रहायचे नाही. उद्या गावात दिसला तर तुम्हाला मारुन टाकु. घरदार पेटवून देवू,’ अशी धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादी महिलेच्या बहिणीच्या गळ्यातील सोन्याची पोत गहाळ झाली. घटनेनंतर महिलेने राहुरी पोलिसात फिर्याद दिली. भारत भाऊसाहेब गायकवाड, अनिल भाऊसाहेब गायकवाड, प्रसाद अण्णासाहेब पाळंदे, रेखा अण्णासाहेब पाळंदे, सुनिता भारत गायकवाड, दिपाली अनिल गायकवाड ( रा. उंबरे ता. राहुरी). या सहाजणांवर विनयभंग, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला. तपास पो. नि. मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नाईक वाल्मिक पारधी करीत आहे.