नंदुरबार : दुसऱ्या बायकोसाठी पहिल्या बायकोला दिला ‘शॉक’ | पुढारी

नंदुरबार : दुसऱ्या बायकोसाठी पहिल्या बायकोला दिला 'शॉक'

नंदुरबार ; पुढारी वृत्‍तसेवा

दुसऱ्या बायकोसाठी नवऱ्याने पहिल्या बायकोला थेट ‘शॉक’ देऊन जीवे  मारण्याचा प्रयत्न केल्‍याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. पती, त्‍याची दुसरी पत्नी आणि सासर्‍याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लक्ष्मी तिरसिंग पटले ( रा. तळोदा) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की,  पती मुकेश जयसिंग खर्डे आणि त्यांची दुसरी पत्नी गीता खर्डे यांनी आमच्या घरातून निघून जा, असा तगादा लावला. यासाठी मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरु केले. पती मुकेश व गीता या दाेघांनी शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली.  आमच्‍या घरातून निघुन जा, असे सांगत सासरे जयसिंग यांनीही शिवीगाळ करुन ढकलून दिले.

पती मुकेश व त्याची दुसरी पत्नी गिता हिने लक्ष्‍मी यांचा हात धरुन घरातील इलेक्ट्रीक बल्ब सॉकेट जवळ ओढत नेले. तेव्हा शॉक लागल्याने लक्ष्मी खर्डे या जमीनीवर पडून बेशुध्द झाल्या. मालदा (  ता. तळोदा ) येथे मुकेश याच्या खर्डे यांच्या राहत्या घरी दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी  तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचलं का?

Back to top button