नाशिक : ग्रामीण आरोग्य केंद्रांवर लवकरच बायोमॅट्रिक | पुढारी

नाशिक : ग्रामीण आरोग्य केंद्रांवर लवकरच बायोमॅट्रिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही महिण्यांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने लवकरच जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर बायोमॅट्रिक हजेरी मशिन बसविण्यात येणार आहे.

दिड महिण्यापुर्वी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य अधिकारी हजर नसताना महिलेची प्रसुती झाली होती. घडलेल्या प्रकारानंतर राज्य महिला आयोगाने जिल्हा परिषद प्रशासनाचे कान टोचले होते. तसेच दोन दिवसांपुर्वी झालेल्या चांदोरी (ता. निफाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूती प्रकरणानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहात नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे बायोमेट्रीक मशीन बसविलेले असताना देखील, कर्मचारी हजर नसल्याने आता हजेरीसाठी थेट कर्मचा-यांच्या मोबाईलमध्ये साॅफ्टवेअर टाकले जाणार आहे. मोबाईल सेल्फीव्दारे हजेरी घेण्यासाठी लागणारे साॅफ्टवेअर खरेदीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने सादर केला आहे. या प्रस्तावानुसार, जिल्हयातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील कर्मचा-यांना हजेरी सक्तीची केली जाणार आहे. यात हजेरीसह फोटो अपडेशन, लाईव्ह लोकेशन आणि जिओ टॅगिंग या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी नेमका कुठे आहे याबाबत यंत्रणेला तात्काळ कळणार आहे.

दिशा समितीत गंभीर दखल
अंजनेरी प्रकरणात खुद्द राज्य महिला आयोगाने ताशेरे ओढल्यानंतरही तब्बल दीड महिनाभरापासून बायोमॅट्रिक हजेरी यावर चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात, यावर कोणताही कारवाई झाली नाही. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पायरीवर महिलेची प्रसूती झाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणाची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिशा समितीत गंभीर दखल घेत, आरोग्य विभागास सुनावले. त्यामुळे आता तत्परता दाखवत जिल्हा परिषद प्रशासन बायोमॅट्रिक प्रणालीबाबत हालचाल करताना दिसत आहे.

हेही वाचा:

Back to top button