नाशिकरोडला आता ३५ ठिकाणांवर २२५ सीसीटीव्हीची नजर | पुढारी

नाशिकरोडला आता ३५ ठिकाणांवर २२५ सीसीटीव्हीची नजर

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक रोड परिसर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या उद्देशाने तसेच सर्वसामान्य आणि विशेषतः महिला वर्गाची सुरक्षितता वाढली आहे. हा केंद्रबिंदू म्हणून प्रभाग २० मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. या भागात रप्पाटप्प्याने एकूण 35 ठिकाणी 225 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, अशी माहिती आमदार राहुल ढिकले यांनी दिली.

महिलांनी घराबाहेर फिरताना विशेष काळजी घ्यावी, सोनसाखळी चोरांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक शरमाळे यांनी केले. – अशोक कुमार शरमाळे, पोलिस निरीक्षक.

प्रभाग क्रमांक मधील २० गुजराती हॉस्पिटलच्या समोरील शुभदा सोसायटीत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या कामाचे उद्घाटन आमदार ढिकले यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोककुमार शरमाळे, अंबादास पगारे उपस्थित होते. आ. डिकले म्हणाले, नाशिक रोडचा विकास होत असताना गुन्हेगारी त्यामुळे परिसराच्या सुरक्षिततेबरोबरच गुन्ह्यांची उकल लवकर होण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविण्याची मागणी होती. प्रभाग वीसमध्ये पुढील टप्प्यात एकूण २२५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. नाशिक रोड आणि विशेषतः प्रभाग २० परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. त्यात आ. राहुल ढिकले यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्वास संभाजी मोरुस्कर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास डॉ. विलास गुजराथी, लालभाई पठाण, रईस शेख हसन शेख, मौलाना मेहमूद आलम, कल्पना गांगुर्डे, विनय कर्नावट, सिकंदर खान, जे. डी. कुलकर्णी, विजया करे मिलिंद झोटिंग, कमलाकर कोतवाल, रंजना कुंबळे, माधुरी झोटिंग, आसावरी मोरुस्कर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिक रोडचा विकास होत असताना गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे परिसराच्या सुरक्षिततेबरोबरच गुन्ह्यांची उकल लवकर होण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविण्याची मागणी वाढली आहे. – ॲड. राहुल ढिकले, आमदार.

हेही वाचा:

Back to top button