

पुढारी ऑनलाइन डेस्क : Dhirendra Shastri : बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री सध्या बिहारच्या पटना येथील आहे. एकीकडे त्यांच्या सभांना गर्दी होत असताना काल रात्री त्यांच्या टपाल खात्याजवळ लावण्यात आलेल्या एका पोस्टरवर काळे फासून त्यावर 'चोर-420' लिहिले आहे.
बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) हे त्यांच्या चमत्कारिक कारनाम्यामुळे भक्तांमध्ये प्रसिद्ध आहेत. तसेच नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने नेहमीच चर्चेत असतात. बाबा धीरेंद्रे शास्त्री सध्या पटना येथे आहे. तिथे त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आचार्य किशोर कुणाल यांना दिलेल्या वागणुकीमुळे कुणाल यांचे समर्थक बागेश्वर बाबांवर चांगलेच रागावले आहेत.
धीरेंद्र शास्त्री हे सध्या पटना येथे आहेत. त्यांचा 13 मे ते 17 मे दरम्यान नौबतपूरच्या तरेत गावात हुनमंत कथेचा कार्यक्रम करत आहेत. आज याचा अंतिम दिवस आहे. दरम्यान बागेश्वर बाबा मंगळवारी पटनाच्या महावीर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांच्याभोवती गर्दी जमत असल्याचे पाहून त्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांनी त्यांच्याभोवती सुरक्षा साखळी तयार केले. यावेळी तेथील आचार्य किशोर कुणाल यांना एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा खांदा लागला. तसेच त्यांनी आचार्य कुणाल यांना देखील बागेश्वर बाबांच्या जवळ जाऊ दिले नाही. त्यामुळे महावीर मंदिरातील अनेक लोक त्यांच्या याच गोष्टीवरून त्यांच्यावर नाराज झाले आहेत. तर काही जण संतापले होते. मात्र, याविषयी मंदिर प्रशासन काहीही सांगायला तयार नाही.
बागेश्वर बाबा धीरेंद्रनाथ शास्त्री यांना यापूर्वीही विरोध झाला होता. मंगळवारी रात्री जीपीओ जवळील त्यांच्या पोस्टरवरील त्यांच्या चित्रावर काळे फासले. तसेच त्यावर चोर ४२० असे लिहिले आहे. या घटनेपूर्वीदेखील त्यांचे पोस्टर फाडून त्यांच्या निषेध करण्यात आला होता. तर दुसरीकडे या घटनांमुळे बागेश्वर बाबांच्या भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
हे ही वाचा :