जळगाव : पती-पत्नीचा वाद सोडवण्यास गेलेल्या तरुणाची हत्या | पुढारी

जळगाव : पती-पत्नीचा वाद सोडवण्यास गेलेल्या तरुणाची हत्या

जळगाव : पती-पत्नीचे जोराचे भांडण सुरु असताना त्यांची समजूत घालण्यासाठी गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. आरोपीने तरुणाच्या डोक्यात वीट मारल्याने तरुण जागीच गतप्राण झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील वराड बु. येथे घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात एकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिसन भोडा नरगावे (वय ४०, करचोली, ता.सेंधवा) असे मयत तरुणाचे नाव आहे. धरणगाव तालुक्यात वराड बु.॥ गावातील रामजी ऑईल मिलजवळ नजरीया शुभाराम कुमारीया (वय ३५) व त्याची पत्नी बानुबाई या दोघांचे भांडण सुरु होते. आरोपी हा त्याच्या पत्नीसोबत वाद घालून शिवीगाळ करत असल्याचे पाहून बिसन याने नजरीया याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या नजरीया याने आमच्या पती-पत्नीच्या भांडणात का पडतोय?, असे बोलून हातात विट घेऊन बिसनच्या डोक्यावर, तोंडावर व छातीवर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी गोटू भोडू नरगावे (करचोली, ता.सेंधवा) यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नजरीया शुभाराम कुमारीया यास अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक प्रमोद आर.कठोरे करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button