नाशिक : एसव्हीकेटीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांचा अविष्कार | पुढारी

नाशिक : एसव्हीकेटीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुणांचा अविष्कार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील देवळाली कॅम्प, श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शुक्रवारी (दि.१२) युवा सप्ताहनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुप्त विविध कलागुणांच्या अविष्काराचे सादरीकरण करीत कार्यक्रमाचा उत्साह वाढविला.

नाशिकरोड

‘झुमका वाली पोर’, ‘ललाटी भंडार’ आदी विविध मराठी, हिंदी गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील सादरीकरणाला उत्तम प्रतिसाद दिला. शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले. प्रायार्य डॉ. एस. एस. काळे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाप्रमाणेच सुप्त कलागुणांना वाव देत संधीचे सोने करत सांस्कृतिक कार्यक्रमात कलागुण सादर केले पाहीजेत. कला हे देखील एक क्षेत्र असल्याचे त्यांनी सांगीतले. याप्रसंगी सेवक संचालक एस. के. शिंदे, वैभव पाळदे, माजी उपप्राचार्य सुनिता आडके, डॉ. विशाखा बागुल, गजीराम मुठाळ, उपप्राचार्य डी. टी. जाधव, श्याम जाधव, डॉ. जयश्री जाधव आदी उपस्थित होते.

नाशिकरोड

हेही वाचा:

Back to top button