Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांचे निलंबन मागे | पुढारी

Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांचे निलंबन मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह  (Param Bir Singh) यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने याबाबतचे आदेश आज (दि. १२) काढले. त्यामुळे परमबीरसिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींचे वसुलीचे टार्गेट दिल्याचा खळबळ जनक गौप्यस्फोट परमबिर सिंह (Param Bir Singh) यांनी केला होता. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. तर या आरोपामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना अटकही झाली होती. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचे निलंबन मागे घेतले आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

कॅटनेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचे आदेश आज काढले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

कॅटने एक निकाल दिला आहे. ज्या अंतर्गत परमबीर सिंह यांची विभागीय चौकशी चुकीची असल्याचे घोषित करून ती बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच निलंबनाचा आदेश परत घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button