नाशिक : रस्त्यालगत बायोमेडिकल वेस्ट टाकल्याने २५ हजारांचा दंड | पुढारी

नाशिक : रस्त्यालगत बायोमेडिकल वेस्ट टाकल्याने २५ हजारांचा दंड

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

तिडकेनगर येथील प्रियंका पार्क रणभूमी रस्त्यालगत क्लिनिकमधील बायोमेडिकल वेस्ट टाकल्याने मनपा सिडको आरोग्य विभागाने क्लिनिकवर कारवाई करत २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

तिडकेनगर येथील प्रियंका पार्क रणभूमी रस्त्यावर क्लिनिकमधील बायोमेडिकल वेस्ट यामध्ये वापरलेले इंजेक्शन, सुया, बँडेज, मेडिसिन फेकलेले आढळले. याविषयी घनकचरा विभागाकडे परिसरातील नागरिकांनी तक्रार केली असता सिडको विभागीय आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे व स्वच्छता निरीक्षक विशाल आवारे, सहकारी बिरजू गोगालिया यांनी संबंधित रुग्णालयाला 25 हजार रुपयांचा दंड केला. सर्व हॉस्पिटल्स, क्लिनिक, मेडिकल यांनी बायोमेडिकल वेस्ट सार्वजनिक ठिकाणी टाकू नये, अन्यथा गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button