नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार; एक गंभीर

नाशिक : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार; एक गंभीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना राजुरबहुला शिवारातील हॉटेल सरबजीत समोर घडली आहे.  या अपघातात सुभाष धर्मा चव्हाण यांचा मृत्यू झाला असून गणपत अंकुश पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. प्रकाश चव्हाण यांनी वाडिवऱ्हे पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. अज्ञात वाहनाने (एमएच ४८ बीएस ०२०४) दुचाकीस पाठीमागून कट मारला. त्यामुळे झालेल्या अपघातात सुभाष चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर गणपत पवार गंभीर जखमी झाले. संशयित वाहनचालक अपघातानंतर पसार झाला असून याप्रकरणी वाडिवऱ्हे पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news