हिंगोली : महावितरणलाच शॉक! चोरट्यांनी पळविली ७४ पोलवरील विद्युत तार | पुढारी

हिंगोली : महावितरणलाच शॉक! चोरट्यांनी पळविली ७४ पोलवरील विद्युत तार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कधी कशाची चोरी होईल याचा काही नेम नाही. सेनगाव तालुक्यात चोरट्यांनी चक्क ७४ पोलवरील २५ क्विंटल वजनाच्या वीज तारा चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सेनगाव तालुक्यातील शाखा गोरेगाव १ अंतर्गत असणाऱ्या ३३ केव्ही तसेच ११ केव्ही केंद्राशी जोडलेल्या तब्बल ७४ पोलवरील वीजतारा १ मार्च ते १२ एप्रिलदरम्यान अज्ञात चोरच्यांनी चोरून नेल्या. या तारांची लांबी सुमारे १२ हजार ३०० मीटर असून २५ क्विंटल वजन होते. यामुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत गोरेगावचे सहायक अभियंते सत्यनारायण बाबूराव वडगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button