पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत | पुढारी

पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘अल निनो’च्या संकटामुळे मान्सून आगमन लांबणीवर पडण्याची चिन्हे पाहता महापालिकेला येत्या 31 जुलैऐवजी ऑगस्टअखेरपर्यंत गंगापूर धरणातील पाणी पुरवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा व पुढील चार महिने नाशिककरांची तहान भागविण्याचे गणित जुळवताना तब्बल 600 दलघफू पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे पाणीकपात अटळच मानली जात असून, पुढील चार महिन्यांत 24 दिवस ड्राय ठेवावे लागतील. मनपा आयुक्त पुढील आठवड्यात बैठक घेणार असून, पाणीकपातीचे नियोजन कसे करायचे, याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहेत.

मागील आठवड्यात राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या उपस्थितीत नाशिक शहराच्या पाणीकपातीचा निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय विभागीय महसूल आयुक्तांच्या कोर्टात टोलवण्यात आला. त्यांच्याकडून याबाबत ठोस निर्णय होणे अपेक्षित असताना त्यांनी याबाबतचे अधिकार आयुक्तांना दिले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून लागू होणार्‍या पाणीकपातीचा निर्णय अद्याप होऊ शकला नाही. दरवर्षी गंगापूर, दारणा व मुकणे या तिन्ही धरणांतून नाशिक मनपासाठी पाच हजार 800 दलघफू पाणी राखीव असते. हे पाणी 31 जुलैपर्यंत पुरवले जाते. पण, यंदा मान्सूनच्या आगमनाला ऑगस्ट उजाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मनपाला सर्व शक्यता गृहीत धरून उपलब्ध पाणी आता 31 ऑगस्टपर्यंत पुरविण्याचे काटकसरीचे नियोजन करावे लागत आहे. त्यानुसार एप्रिल व मे महिन्यात आठवड्यातून एकदा व जून व जुलैमध्ये आठवड्यातून दोनदा असे एकूण 24 दिवस पाणीकपातीचे मनपाचे नियोजन होते. पण, एप्रिल संपत आला तरी याबाबत अद्याप फैसला होऊ शकला नाही. सद्यस्थितीत गंगापूर धरण समूह व इतर धरणांतील पाणी आरक्षणाचा विचार करता 600 दलघफू पाण्याची कमतरता आहे. पाणीकपात केली तरच उपलब्ध जलसाठ्यात 31 ऑगस्टपर्यंत नाशिककरांची तहान भागविणे शक्य होईल. याबाबत लवकर निर्णय न घेतल्यास येत्या काळात मोठ्या ‘पाणीबाणी’ला सामोरे जावे लागेल.

.. तर 400 दलघफूचा तुटवडा
मनपाने जलसंपदा विभागाला पत्र पाठवत गंगापूर धरणातून अतिरिक्त 200 दलघफू पाण्याची मागणी केली आहे. हे पाणी मिळाल्यास फक्त 400 दलघफू पाणी तुटवडा असेल. त्यामुळे पाणीकपातीचे ड्राय डे कमी होतील. त्यामुळे जलसंपदा काय निर्णय घेते याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा:

Back to top button
हौसला भी तू… जूनून भी तू… मदर डे : दिग्गज अभिनेत्री आपल्या लाडक्या लेकीसोबत हो तुलाच पाहायला आलोय कितीदा प्रेमात पाडशील संस्कृती हॉट शालिनीनं जंगलात लावली आग… हॉट बॉडीकॉन ड्रेसमध्ये नुसरत भरुचाचा किलर अवतार! हॉट पूजा गौरचे साडीतील सोज्वळ रूप पाहिले का ? (web story) हॉट दिशा पटानीची व्हायरल किक (Video) हॉट क्रितीचा ऑरेंज फ्लोलर रफलमध्ये भन्नाट देशी लूक हॉट ॲण्ड बोल्ड अपेक्षा पोरवालच्या नव्या लूक्सची चर्चा हेमांगी कवी – ये Pool राणी, असचं तुझ्यासारखं स्वच्छंदी जगता आलं पाहिजे हे काय! झगा मगा मला बघा