नाशिक : होळी निमित्त टिमक्या वाजून, सरपण विकून गॅस सिलेंडरला वाहिली श्रद्धांजली | पुढारी

नाशिक : होळी निमित्त टिमक्या वाजून, सरपण विकून गॅस सिलेंडरला वाहिली श्रद्धांजली

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे, गॅस सिलेंडरची किमंत ११५० रूपये झाली आहे. सणासुदीच्या काळात महागाई वाढली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला मोठा आर्थिक बोजा उचलावा लागतो आहे. तर सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात फत्तेबुरूजनाका, येवला येथे होळी सणानिमित्त टिमक्या वाजून, सरपण विकून व गॅस सिलेंडरला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहून केंद्र सरकारचे धोरणाविरुद्ध निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.

केंद्रातील भाजप सरकारचे चुकीचे धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर व जीवानशयक वस्तूवरील वाढवलेल्या जी.एस.टी. मुळे सामान्य माणसाचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. या सर्व बाबीमुळे आज  सोमवार, दि. 6 येवल्यात तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महागाई कमी झालीच पाहिजे, गॅसचे किंमती कमी करा, तसेच हुकुमशाही नही चलेंगी. अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, काॅ.भगवान चित्ते, बळीराम शिंदे, तालुका कार्याध्यक्ष सुकदेव मढवई, विलास नागरे, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, दयानंद बेंडके, शिवनाथ खोकले, राजेंद्र गणोरे, झेड. डब्ल्यू. ताडगे, गणेश मथुरे, अशोक नागपुरे, दत्तु कोटमे, मयुर मोहारे, सचिन शेवाळे, अब्दुल शेख, खंडू खैरनार, छबुराव लोखंडे, अकील शेख, संजय सासे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button