आत्मघाती हल्‍ल्‍याने पाकिस्‍तान पुन्‍हा हादरलं! स्फोटात ९ पोलिस ठार | पुढारी

आत्मघाती हल्‍ल्‍याने पाकिस्‍तान पुन्‍हा हादरलं! स्फोटात ९ पोलिस ठार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानमध्‍ये पुन्‍हा एकदा आत्‍मघाती हल्‍ला झाल्‍याचे वृत्त आहे. बलुचिस्तान प्रांतात झालेल्या आत्‍मघाती हल्‍ल्‍यात ९ पोलीस ठार झाले आहेत, असे वृत्त पाकिस्‍तानच्‍या माध्‍यमांनी दिले आहे. सिबी आणि कच्छ सीमेवर हा हल्‍ला झाला असून प्राथमिक तपासात हा आत्मघाती हल्ला असल्याचे निष्पन्न झाले आहे. ( Suicide Bombing In Pakistan )

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बलुचिस्तानचे पोलिस कर्मचारी आपल्‍या घरी परतत असताना आत्‍मघाती हल्‍ला झाला. स्फोट एवढा भीषण होता की, पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे वाहन पलटी झाले. या स्फोटात ९ पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पाकिस्तानमध्‍ये मागील काही दिवसांपासून पुन्‍हा एकदा दहशतवादी हल्ल्‍यांमध्‍ये वाढ झाली आहे. जानेवारी महिन्‍यात पेशावरमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १०० हून अधिक पोलिस ठार झाले होते. पोलीस मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले असताना हा हल्ला घडवून आणण्‍यात आला होता. पोलिसांच्या वेषात आलेल्या एका दहशतवाद्याने बॉम्बस्फोटाने स्वत:ला उडवले होते. फेब्रुवारीमध्येच कराची पोलिस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. . या हल्ल्यात सशस्त्र दहशतवाद्यांनी पोलीस मुख्यालयात घुसून तीन जण ठार तर 10 जण जखमी झाले. मात्र, सुरक्षा दलाच्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले होते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button