नाशिक : येवल्यातील शिवसैनिकांसोबत छगन भुजबळ यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा | पुढारी

नाशिक : येवल्यातील शिवसैनिकांसोबत छगन भुजबळ यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

नाशिक (येवला) :  पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते ५ मार्च १९८३ साली येवला शहरात पहिली शिवसेनेची शाखा सुरू केली. या स्थापनेला आज रविवारी, दि. 5 चाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येवला शहरातील शिवसेनेचे नेते किशोर सोनवणे यांच्यासह जुन्या शिवसैनिकांनी येवला संपर्क कार्यालयात छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत छगन भुजबळ यांनी शिवसैनिकांना जय महाराष्ट्र केला.
येवल्यातील जुने शिवसैनिक किशोर सोनवणे यांच्यासह शिवसैनिकांनी रविवार, दि. 5 छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जुन्या छायाचित्रांचा अल्बम छगन भुजबळ यांना दाखविला. जुने फोटो बघताच छगन भुजबळ यांनी येवल्यातील सभा स्व.बाळासाहेब ठाकरे व स्व.दादा कोंडके इतर नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला. उपस्थित शिवसैनिकांसमवेत जुन्या आठवणींच्या गप्पांमध्ये छगन भुजबळ व कार्यकर्ते रममान झाल्याचे बघावयास मिळाले. येवल्यातील शिवसेना शाखा स्थापनेबाबत जुन्या कार्यकर्त्यांची छगन भुजबळ यांनी आस्थेने चौकशी केली. यावेळी शिवसैनिक किशोर सोनवणे, बाजीराव भोर, चंद्रमोहन मोरे, गणेश सोनवणे, अर्जुन मोडसे, भागीनाथ थोरात यांनी भेट घेत छगन भुजबळ यांचा भगवी शाल व पुष्पगुच्छ देत सन्मान केला.

हेही वाचा:

Back to top button