यवतमाळ : भूमिगत जलवाहिनी फुटल्याने जमिनीला तडे; तरुणी जखमी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे यवतमाळकरांच्या 'जीवावर उठल्याचे शनिवारी (दि.४) पुन्हा एकदा अधोरेखित झाले. येथील माईंदे चौक ते अँग्लो हिंदी हायस्कूल मार्गावर घडलेल्या घटनेने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. पाण्याच्या प्रचंड दबावामुळे भूमिगत जलवाहिनी फुटल्याने जमिनीला मोठे तडे गेले. यात एक वाहनधारक तरुणी जखमी झाली.

शनिवारी चापडोह पाणीपुरवठा योजनेची जीर्ण झालेली जलवाहिनी अनपेक्षितपणे फुटली. पाईपमधील हजारो लिटर पाणी रस्त्यावर आल्याने हा संपूर्ण परिसर जलमय झाला. या घटनेमुळे शहरात कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते, याचे प्रत्यंतर आले.
चार वर्षांपूर्वी शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. या योजनेंतर्गत संपूर्ण शहरात नवीन परंतु निकृष्ट जलवाहिनी टाकण्यात आली आहे. चापडोह पाणी पुरवठा योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा होत नव्हता. मात्र, त्या पाईपमध्ये पाणी भरून होते. अत्यंत जीर्ण झाल्यामुळे जलवाहिनीमधील पाण्याच्या दबावामुळे जमिनीला तडे जाऊन पाणीवर उडाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news