नाशिक : दिव्यांगांसाठी सव्वा कोटीचा निधी खर्च

नाशिक : दिव्यांगांसाठी सव्वा कोटीचा निधी खर्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिव्यांगांसाठीच्या योजनांवर खर्च करण्यात नाशिक जिल्हा परिषदेने गेल्या आर्थिक वर्षात अव्वल क्रमांक मिळविला होता. यंदाही 100 टक्के निधी खर्चित होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी दिली आहे. दिव्यांगांसाठीच्या निधीमध्ये यंदा वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या प्रत्येकी दोन योजनांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून 5 टक्के निधी हा दिव्यांगांसाठी असतो. 2022-23 च्या सेस निधीतून तरतूद केलेल्या 1 कोटी 31 लाख रुपयांचा निधी पूर्ण खर्च होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षी निधी खर्चाबाबत नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. यंदा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांगांसाठी वैयक्तिक लाभाच्या 2 आणि सामाजिक लाभाच्या 2 अशा चार योजनांच्या आधारे हा निधी खर्च करण्यात येत आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये दिव्यांग – दिव्यांग विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून 50 हजार रुपयांचे अनुदान दिले आहे. तसेच वैयक्तिक लाभाच्या दुसर्‍या योजनेच्या माध्यमातून एकूण 83 लाभार्थ्यांना घरकुलासाठी निधी मंजूर केला. त्यापैकी 50 लाभार्थ्यांना निधीचे वितरण करण्यात आले असून उर्वरित 33 लाभार्थ्यांना लवकरच निधी वर्ग होणार आहे.

निविदा प्रसिद्ध
सामूहिक योजनेच्या माध्यमातून दिव्यांग उपकरणांची खरेदी करण्यात येत आहे. त्यामध्ये बालक जन्माला येताच कर्णबधिर आहे का, हे तपासण्यासाठी असलेले ओएई मशीन खरेदी करण्यात येणार आहे. तीन मशीनसाठी 10 लाखांची तरतूद केलेली आहे. हे तीन मशीन जिल्ह्यातील जास्त जन्मदर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात असणार आहेत. तसेच बेरा चाचणी यंत्र घेण्यात येणार आहे. साडेबावीस लाख रुपये किंमत असलेल्या या मशीनद्वारे किती टक्के बहिरेपणा आहे हे लक्षात येणार आहे. त्यानुसार प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे दोन्ही यंत्र खरेदीबाबत निविदा प्रसिद्ध केल्या असून लवकरच खरेदी होणार आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news