नाशिक : स्नॅपचॅटद्वारे अल्पवयीन मुलीला धमकावले, अश्लील व्हिडिओ केला व्हायरल | पुढारी

नाशिक : स्नॅपचॅटद्वारे अल्पवयीन मुलीला धमकावले, अश्लील व्हिडिओ केला व्हायरल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प येथील अल्पवयीन मुलीचा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात पोक्सो, विनयभंग, माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेने जानेवारी महिन्यात स्नॅपचॅट या सोशल माध्यमावर खाते सुरू केले होते. त्यावर ती सक्रिय असताना, संशयिताने पीडितेशी संपर्क साधला. शाळेतील मित्र असेल, असा समज करून पीडितेने त्याच्यासोबत चॅटिंग केले. दरम्यान, संशयिताने पीडितेस धमकावत तिच्याकडून अश्लील व्हिडिओ मागवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button