शाळांना आरटीई नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस | पुढारी

शाळांना आरटीई नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत शाळांना नोंदणी करण्यासाठी शुक्रवार शेवटचा दिवस आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना नामांकीत खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. त्यानंतर सरकारतर्फे या विद्यार्थ्यांची फी प्रतिपूर्ती करण्यात येते.

गेल्यावर्षी ९०८८ शाळांत १ लाख २ हजार २२ जागा होत्या. यंदा मात्र ६ फेब्रुवारी अखेर ८,१३० शाळांमध्ये ९४,८८८ शाळांची नोंदणी झाली आहे. तर मुंबईत गेल्या वर्षी ३४३ शाळांत ६, ४८१ जागा होत्या. यंदा ३३६ शाळांत ६, ४६० जागांची नोंदणी झालेली आहे. शाळांनी आपल्या शाळेत असलेल्या सर्व तुकड्यानुसार जागांची नोंदणी करावी यासाठी पुन्हा मुदत देण्यात आली आहे. १० फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. ऑनलाइन प्रक्रियेत सर्व जागांची पडताळणी शिक्षणाधिकारी व मुंबईतील शाळांची शिक्षण निरीक्षकांमार्फत केली जाणार आहे.

Back to top button