आमदार सरोज अहिरे : शासकिय नोकरीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवा; राजश्री अहिरराव यांना आव्हान

नाशिकरोड : पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सरोज अहिरे. (छाया: उमेश देशमुख)
नाशिकरोड : पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सरोज अहिरे. (छाया: उमेश देशमुख)

नाशिक (नाशिकरोड) : पुढारी वृत्तसेवा
देवळाली विधानसभा मतदार संघात दोन भगीनी माझ्या विरोधात कट कारस्थान रचत आहे. मी मंजूर केलेला शेतकरी हिताचा निधी परस्पर रद्द करुन मला अडचणीत आणण्याचे काम अलका अहिरराव व राजश्री अहिरराव या करीत असल्याचा आरोप आमदार सरोज अहिरे यांनी पत्रकार परिषदेत केला. "हिंमत असेल तर राजश्री अहिरराव यांनी आपल्या तहसिलदार पदाचा राजीनामा देऊन माझ्यापुढे विधानसभेची निवडणूक लढवून दाखवावी," असे आव्हान आमदार सरोज अहिरे यांनी दिले.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया व प्रसिध्दी माध्यमांमध्ये तहसिलदार राजश्री अहिरराव त्यांच्या भगिनी पाटबंधारे विभागाच्या अभियंता अलका अहिरराव आणी नाशिकरोड देवळाली विधानसभा मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या विषयी वृत्त प्रसिद्ध होत आहे. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांनी मंगळवारी ( दि. १७ ) मतदार संघात पत्रकार परिषद घेऊन अहिरराव भगिनी यांच्याकडून त्यांच्यावर होत असणाऱ्या राजकिय आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेत आमदार सरोज अहिरे यांनी दोनोही भगिणीचे थेट नाव घेता आरोप केले. अलका अहिरराव यांच्या बदलीचा आणि माझा काहीही एक संबंध नसून आमदार राहूल ढिकले, जे. पी. गावित, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी अलका अहिरराव यांच्या बदलीची मागणी केलेली होती. यात माझा काडीमात्र संबंध नाही, असा खुलासा आमदार सरोज अहिरे यांनी केला. त्याचप्रमाणे राजश्री अहिरराव यांना जिल्हाधिकारी गंगाधर डी. यांनी सुट्टीवरून आल्यावर रुजू करुन घेतले नाही, यात माझा काडीमात्र संबंध नाही. याविषयी त्यांनी केलेले आरोप बिनबूडाचे आहेत, असा खुलासा आमदार सरोज अहिरे यांनी करुन प्रसिध्दी माध्यमांनी याविषयी खात्री करून वृत्त प्रसिद्ध करावे, चुकीचे व एकाकी वृत्त प्रसिद्ध करू नये, अभ्यास करुन बातमी करावी असेही आ. अहिरे यांनी यावेळी म्हटले.

तहसिलदार राजश्री अहिरराव
तहसिलदार राजश्री अहिरराव

तर हक्क भंग ठराव मांडणार …
अहीरराव भगिनीनी माझ्या विरोधात कट कारस्थान रचने थांबावे, अन्यथा मार्च महिन्याच्या अधिवेशनात त्यांच्या विरोधात मी हक्क भंग दाखल करेल, तसा मला अधिकार असल्याचा इशारा आमदार सरोज अहिरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news